Sunday, May 31, 2015

आज कवी सतीश सोळांकूरकर यांचा वाढदिवस यानिमित्ताने त्यांची ’मातीचा बाहुला’ ही ह्रद्याला भिडणारी कविता... सतीश दादांना "कविता मना-मनातली" परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! कविता नक्कीच आवडेल याची खात्री आहे तेव्हा "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो...
[ Satish Solankurkar - Poet - Kavita Mana Manatali ]


Friday, May 29, 2015

या रखरखीत उन्हात महानोरांची ही कविता नक्कीच अल्हाददायक हिरवळीचं काम करेल...कविता आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो..
[Mahanor - Poet - Kavita Mana Manatali ]


Wednesday, May 27, 2015

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतिस "कविता मना-मनातली"कडून विनम्र अभिवादन!!! 
[ Kavita Mana Manatali ]

Tuesday, May 26, 2015

 Hey Friends those who missed my show of Marathi Bhasha Divas on Radio Mirchi 98.3 FM with RJ Jeeturaaj can click on this Link and Enjoy... 

http://www.radiomirchi.com/mumbai/whats-hot/audio/listen/professor-geetesh-shinde-spells-marathi-poetic-magic-over-jeeturaaj/29010
दिल पे मिला हुआ जख्म मिटाएं न मिटता हें... याँदों के साँयें मे जिने का गम ही नसिब होता हें उसके छोड जाने के बाद... शायर अदीम हाश्मी की दिल का दर्द बयाँ करनेवाली गजल... पसंद आएं तो "कविता मना-मनातली" पेज लाईक और शेअर करना ना भूलियेगा दोस्तो... कुछ शब्दों के मानें जो आप जानना चाहो शायद...
चार सू = In four directions, In all directions
गिलाफ़ = Cover, Envelope
[ Aadim Hashmi - Poet - Kavita Mana Manatali ]

Sunday, May 24, 2015

सकाळ वृत्तपत्राच्या नागपुर आवृतित संवेदना प्रकाशन प्रकाशित "निमित्तमात्र" या माझ्या कवितासंग्रहाचे कवयित्री सुमती वानखेडे यांनी केलेले परिक्षण
 [ Nimittamatra by Geetesh Shinde in News on 24/5/15 ]


Friday, May 22, 2015

हसता-हसवता खूप गंभीर मुद्द्याला हात घालणं ही कविवर्य अशोक चक्रधर यांची खास शैली... "कविता मना-मनतली"च्या रसिकांसाठी आज हास्य-व्यंग शैलीतली कविता...आवडल्यास "कविता मना-मनातली" लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो.
[ Ashok Chakradhar - Poet - Kavita Mana Manatali ]

Tuesday, May 19, 2015

मनोहर सप्रेंची कविता वाचल्यावर क्या बात हें हेच शब्द ओठावर येतात...कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...
[ Manohar Sapre - Poet - Kavita Mana Manatali ]

Sunday, May 17, 2015

आईवर किती विविधतेने लिहिलं गेलंय... आणि कितिही लिहिलं तरी कमीच वाटतं... आई आणि मुलगी यामधील हळुवार संवाद कवी संजय चौधरी यांनी किती सहजतेने मांडलाय... कविता तुमच्या ह्रद्यापर्यंत पोहचल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग फॉलो आणि शेअर करायला विसरू नका दोस्तांनो...
[ Sanjay Chaudhary - Poet - Kavita Mana Manatali ]


Friday, May 15, 2015

मर्ढेकरांच्या या गाजलेल्या कवितेचा अर्थ तुम्हाला काय उलगडतो ते सांगा " कविता मना-मनातली "ला... 
[ Mardhekar - Poet - Kavita Mana Manatali ]

Tuesday, May 12, 2015

मुंबईत रोज किमान एकदा तरी आपल्या घरी पाणी येतं, म्हणूनच कदाचित आपल्याला पाण्याची तेवढीशी किंमत नाही. परंतु महाराष्ट्राच्या उर्वरित भागात भीषण परिस्थिती आहे आणि दिवसेंदिवस ती गंभीर होणार आहे... अशावेळी पाण्यासाठी प्रार्थना करण्यावाचून काहीच पर्याय नाही... कवी नलेश पाटील यांची ही अशीच एक आर्त प्रार्थना "कविता मना-मनातली "च्या वाचकांसाठी... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग शेअर आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून हा हुंकार दूरवर पोहोचेल...
[ Nalesh Patil - Poet - Kavita Mana Manatali ]


Monday, May 11, 2015

काल फेसबुक आणि व्हॉट्स अपवर अनेकांनी ’मदर्स डे’ अगदी जोषात साजरा केला... आपल्या आईचा जूनासा फोटो डीपी म्हणूनही ठेवला किंवा आईसोबतचे बालपणीचे फोटो शेअर करुन त्यात तिच्या कष्टाचा, त्यागाचा यथोचित उल्लेखही केला. काहींनी आपल्या गेलेल्या आईच्या आठवणीत अश्रूही ढाळले. तर आमच्यासारख्या काहींनी कविताही शेअर केल्या... पण मूळात आपण जीचे फोटो शेअर केले, जीच्यासाठी स्टेट्सचे रकाने भरले ती ’आई’ मात्र या सर्वांपासून दूर स्वत:चं आईपण न मिरवता रोजचंच आयुष्य जगत राहिली... या व्हर्चुअल युगात आईपण सुध्दा एनकॅश केलं जातंय आणि आपण सर्व कॉपी पेस्ट आणि कर फॉरवर्ड यातंच समाधान मानतोय. अशावेळी "कविता मना-मनातली"ला शेअर करावीशी वाटतेय कवी ब्रिटीश नंदी यांची पुढील कविता...

आळसवारच्या वर्तमानपत्राची
वैचारिक घडी घालत
येऊन उभा राहिलो,
स्वयंपाकघराच्या चौकटीत,
आणि, सांगू लागलो काहीबाही
असे-तसे, यंव-त्यंव...

तेव्हा, स्वयंपाकाच्या ओट्याला
ओठंगून आई करीत होती गोळा
कांद्याची सैरभैर साले,
करीत होती साफ
गॅसच्या शेगडीची तेलाने
बुजलेली पुरातन भोके...
सोडवीत होती नव्या दिवसाचा
नवा यक्षप्रश्‍न : नारळ कोण देईल फोडून?
चष्मा उंचावून म्हणालो,
जनरल नॉलेजी सुरात
म्हटले, देऊ थोडके ज्ञान
जुन्यापुराण्या विटक्‍या पिढीला,
होऊ ‘कनेक्‍ट’ जरा
आधुनिक रीतीने
म्हणालो खाकरून :
‘‘ऐक ना, आई...
इम्पॉर्टंट आहे!
तुला माहीत आहे का
ॲना जार्विस ?
जिने सुरू केला
मदर्स डे नावाचा
एक अद्वितीय दिवस,
आरक्षित केला
आख्खा एक दिवस,
जगाच्या रंगबिरंगी कॅलिंडरात
रेखला एक चौकोन
जगातल्या
तमाऽऽऽऽम मातांसाठी!’’

...तरीही आईचे चाललेच होते
काहीतरी त्या भिक्‍कारड्या,
भवतापात लिडबिडलेल्या
शेगडीच्या कडेकडेने.
नव्हतेच तिचे लक्ष काही, कुठे.

‘‘मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी
सारे जग आपल्या आयांना
आठवते, आई!
देतात तिला सुंदरशी मखमली
ग्रीटिंग कार्डे, करतात
लाँग डिस्टन्स कॉल स्वखर्चाने,
किंवा पाठवतात ईमेल वगैरेही!
किंवा म्हणतात सुरेल गाणी
प्रेमस्वरूप आईच्या थोरवीची,
तिच्या निरंतर असण्याची,
किंवा गाळतात आसवे,
तिच्या निरंतर नसण्याची...
होतात दिवसभरासाठ कृतकृत्य,
आठवतात तिचा परिचित अंगगंध
तिचा दमला भागला
सेल्फलेस चेहरा...
तिच्या खमक्‍या पाठकण्याआडून
दडून पाहिलेले क्‍येवढेतरी
अनोळखी चेहरे आणि प्रसंग...

‘‘ऐकत्ये आहेस ना, आई?’’
म्हटले तिला, तर म्हणाली :
‘‘येवढा नारळ देरे फोडून!!’’

सपशेल दुर्लक्ष करत म्हणालो :
‘‘कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून
या दिवशी आईला फुले
देण्याची पद्धत आहे जगात,
ही घे...घे ना, आई!’’

कवठी चाफ्याचे दोन टप्पोरे
गंधकळे तिच्या सुरकुतलेल्या
तळहाती ठेवताना
च्यायला, उगीच आले भडभडून...

स्तंभित होत्साती बघत राहिली,
ती त्या कवठी चाफ्याकडे,
मग खळखळून हसत
म्हणाली येवढेच :
‘‘...गाढवच आहेस!’’

--- ब्रिटीश नंदी
"कविता मना-मनातली"
[British Nandi - Poet - Kavita Mana Manatali ]

Sunday, May 10, 2015

आज मातृदिनानिमित्त निमित्तमात्र या माझ्या कवितासंग्रहातील "वाढदिवस" ही आईसाठी लिहिलेली कविता प्रसिध्द करतोय, आवडल्यास तुमच्या आईला ही कविता ऐकवून तिचे प्रेमळ आशीर्वाद घ्यायला विसरु नका  मित्रांनो...
[ Geetesh Shinde - Poet - Kavita Mana Manatali ]


Saturday, May 9, 2015

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सर यांना "निमित्तमात्र"ची तिसरी आवृती भेट देतानाचा क्षण...

"निमित्तमात्र"ची तिसरी आवृती ज्येष्ठ कवी श्री. सतिश काळसेकर यांना भेट देतानाचा क्षण...
"निमित्तमात्र" हा माझा कवितासंग्रह प्रकाशित होऊन आज सहा महिने पूर्ण झाले. या सहा महिन्यांत अनेक मान्यवर कवींचे, समीक्षकांचे अभिप्राय आणि आशीर्वाद कवितासंग्रहास लाभले. तसेच काव्यरसिकांनी संग्रहाचे भरभरुन स्वागत केले आणि चारच महिन्यांत संग्रहाची तिसरी आवृतिही प्रसिध्द झाली. पत्रांच्या, फेसबुकच्या आणि व्हॉट्स अपच्या माध्यमातून अनेकांनी आपले अभिप्राय कळवले. ते सर्व वाचत असताना कृतकृत्य होतानाच कवितेबद्दल या पुढे अधिक सजग राहण्याची गरज असल्याची जाणिव मनात नेहेमीच अधोरेखित होते. ’संवेदना’ प्रकाशनने माझा कवितासंग्रह प्रकाशित करुन मला काव्य रसिकांसमोर येण्याची संधी दिली त्याबद्दल प्रकाशक श्री. नितिन हिरवे यांचे मन:पूर्वक आभार. "निमित्तमात्र"मधील कवितांचा अचूक ठाव घेऊन साजेसं मुखपृष्ठ आणि रेखाचित्र चित्रित केल्याबद्दल चित्रकार, कवी श्री. विजयराज बोधनकर यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. शेवटी सर्व काव्य रसिकांचे आभार मानून आपले प्रेम असेच माझ्या कवितेवर रहावे हीच अपेक्षा करतो.
--- गीतेश गजानन शिंदे
संपर्क : ९८२०२७२६४६

Wednesday, May 6, 2015


कवयित्री योगिनी राऊळ यांच्या "बाईपणातून बाहेर पडताना" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्या शुक्रवार दि. ८ मे २०१५ सायंकाळी ६ वाजता सुरेंद्र गावस्कर सभागृह , मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, शारदा सिनेमाशेजारी, दादर (पूर्व) मुंबई येथे होणार असून सर्व काव्य रसिकांना या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण. सोहळ्याची निमंत्रण पत्रिका सोबत जोडत आहे. तसेच या निमित्ताने संग्रहातील कवयित्री योगिनी राऊळ यांची एक कविता...

।। प्रकाशन सोहळा ।।

सृजन प्रकाशन प्रकाशित

"बाईपणातून बाहेर पडताना"

या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते


अध्यक्ष : ज्योती म्हापसेकर
वक्ते : सतीश काळसेकर
        : भगवान निळे
        : डॉ. श्यामला गरुड
सूत्रसंचालन : सतीश सोळांकुरकर


शुक्रवार दि. ८ मे २०१५ सायंकाळी ६ वाजता
सुरेंद्र गावस्कर सभागृह,
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,
शारदा सिनेमाशेजारी, दादर (पूर्व) मुंबई.

निमंत्रक : कविता मना-मनातली

[ Yogini Raul - Poet - Kavita Mana Manatali ]

Tuesday, May 5, 2015

आज लोककवी प्रकाश होळकर यांचा जन्मदिवस. "कविता मना-मनातली"कडून प्रकाश दादांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! या निमित्ताने त्यांचीच एक मनातली कविता...
[ Prakash Holkar - Poet - Kavita Mana Manatali ]

Friday, May 1, 2015

महाराष्ट्रदिनाच्या "कविता मना-मनातली"कडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा! या निमित्ताने कवी राजा बढे यांनी लिहिलेले, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या काळजाला भिडणा-या आवाजात घरा-घरांत पोहचवलेले महाराष्ट्रगीत प्रसिध्द करत आहे. सर्वांनी हे गीत जास्तीत जास्त शेअर करावे ही विनंती. तसेच "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करुन या काव्य चळवळीत सहभागी व्हावे...

[ Raja Badhe - Poet - Maharashtrageet - Jay Jay Maharashtra Majha - Kavita Mana Manatali ]