"निमित्तमात्र" हा माझा कवितासंग्रह प्रकाशित होऊन आज सहा महिने पूर्ण झाले. या सहा महिन्यांत अनेक मान्यवर कवींचे, समीक्षकांचे अभिप्राय आणि आशीर्वाद कवितासंग्रहास लाभले. तसेच काव्यरसिकांनी संग्रहाचे भरभरुन स्वागत केले आणि चारच महिन्यांत संग्रहाची तिसरी आवृतिही प्रसिध्द झाली. पत्रांच्या, फेसबुकच्या आणि व्हॉट्स अपच्या माध्यमातून अनेकांनी आपले अभिप्राय कळवले. ते सर्व वाचत असताना कृतकृत्य होतानाच कवितेबद्दल या पुढे अधिक सजग राहण्याची गरज असल्याची जाणिव मनात नेहेमीच अधोरेखित होते. ’संवेदना’ प्रकाशनने माझा कवितासंग्रह प्रकाशित करुन मला काव्य रसिकांसमोर येण्याची संधी दिली त्याबद्दल प्रकाशक श्री. नितिन हिरवे यांचे मन:पूर्वक आभार. "निमित्तमात्र"मधील कवितांचा अचूक ठाव घेऊन साजेसं मुखपृष्ठ आणि रेखाचित्र चित्रित केल्याबद्दल चित्रकार, कवी श्री. विजयराज बोधनकर यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. शेवटी सर्व काव्य रसिकांचे आभार मानून आपले प्रेम असेच माझ्या कवितेवर रहावे हीच अपेक्षा करतो.
No comments:
Post a Comment