काल फेसबुक आणि व्हॉट्स अपवर अनेकांनी ’मदर्स डे’ अगदी जोषात साजरा केला... आपल्या आईचा जूनासा फोटो डीपी म्हणूनही ठेवला किंवा आईसोबतचे बालपणीचे फोटो शेअर करुन त्यात तिच्या कष्टाचा, त्यागाचा यथोचित उल्लेखही केला. काहींनी आपल्या गेलेल्या आईच्या आठवणीत अश्रूही ढाळले. तर आमच्यासारख्या काहींनी कविताही शेअर केल्या... पण मूळात आपण जीचे फोटो शेअर केले, जीच्यासाठी स्टेट्सचे रकाने भरले ती ’आई’ मात्र या सर्वांपासून दूर स्वत:चं आईपण न मिरवता रोजचंच आयुष्य जगत राहिली... या व्हर्चुअल युगात आईपण सुध्दा एनकॅश केलं जातंय आणि आपण सर्व कॉपी पेस्ट आणि कर फॉरवर्ड यातंच समाधान मानतोय. अशावेळी "कविता मना-मनातली"ला शेअर करावीशी वाटतेय कवी ब्रिटीश नंदी यांची पुढील कविता...
आळसवारच्या वर्तमानपत्राची
वैचारिक घडी घालत
येऊन उभा राहिलो,
स्वयंपाकघराच्या चौकटीत,
आणि, सांगू लागलो काहीबाही
असे-तसे, यंव-त्यंव...
तेव्हा, स्वयंपाकाच्या ओट्याला
ओठंगून आई करीत होती गोळा
कांद्याची सैरभैर साले,
करीत होती साफ
गॅसच्या शेगडीची तेलाने
बुजलेली पुरातन भोके...
सोडवीत होती नव्या दिवसाचा
नवा यक्षप्रश्न : नारळ कोण देईल फोडून?
चष्मा उंचावून म्हणालो,
जनरल नॉलेजी सुरात
म्हटले, देऊ थोडके ज्ञान
जुन्यापुराण्या विटक्या पिढीला,
होऊ ‘कनेक्ट’ जरा
आधुनिक रीतीने
म्हणालो खाकरून :
‘‘ऐक ना, आई...
इम्पॉर्टंट आहे!
तुला माहीत आहे का
ॲना जार्विस ?
जिने सुरू केला
मदर्स डे नावाचा
एक अद्वितीय दिवस,
आरक्षित केला
आख्खा एक दिवस,
जगाच्या रंगबिरंगी कॅलिंडरात
रेखला एक चौकोन
जगातल्या
तमाऽऽऽऽम मातांसाठी!’’
...तरीही आईचे चाललेच होते
काहीतरी त्या भिक्कारड्या,
भवतापात लिडबिडलेल्या
शेगडीच्या कडेकडेने.
नव्हतेच तिचे लक्ष काही, कुठे.
‘‘मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी
सारे जग आपल्या आयांना
आठवते, आई!
देतात तिला सुंदरशी मखमली
ग्रीटिंग कार्डे, करतात
लाँग डिस्टन्स कॉल स्वखर्चाने,
किंवा पाठवतात ईमेल वगैरेही!
किंवा म्हणतात सुरेल गाणी
प्रेमस्वरूप आईच्या थोरवीची,
तिच्या निरंतर असण्याची,
किंवा गाळतात आसवे,
तिच्या निरंतर नसण्याची...
होतात दिवसभरासाठ कृतकृत्य,
आठवतात तिचा परिचित अंगगंध
तिचा दमला भागला
सेल्फलेस चेहरा...
तिच्या खमक्या पाठकण्याआडून
दडून पाहिलेले क्येवढेतरी
अनोळखी चेहरे आणि प्रसंग...
‘‘ऐकत्ये आहेस ना, आई?’’
म्हटले तिला, तर म्हणाली :
‘‘येवढा नारळ देरे फोडून!!’’
सपशेल दुर्लक्ष करत म्हणालो :
‘‘कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून
या दिवशी आईला फुले
देण्याची पद्धत आहे जगात,
ही घे...घे ना, आई!’’
कवठी चाफ्याचे दोन टप्पोरे
गंधकळे तिच्या सुरकुतलेल्या
तळहाती ठेवताना
च्यायला, उगीच आले भडभडून...
स्तंभित होत्साती बघत राहिली,
ती त्या कवठी चाफ्याकडे,
मग खळखळून हसत
म्हणाली येवढेच :
‘‘...गाढवच आहेस!’’
--- ब्रिटीश नंदी
"कविता मना-मनातली"
[British Nandi - Poet - Kavita Mana Manatali ]
आळसवारच्या वर्तमानपत्राची
वैचारिक घडी घालत
येऊन उभा राहिलो,
स्वयंपाकघराच्या चौकटीत,
आणि, सांगू लागलो काहीबाही
असे-तसे, यंव-त्यंव...
तेव्हा, स्वयंपाकाच्या ओट्याला
ओठंगून आई करीत होती गोळा
कांद्याची सैरभैर साले,
करीत होती साफ
गॅसच्या शेगडीची तेलाने
बुजलेली पुरातन भोके...
सोडवीत होती नव्या दिवसाचा
नवा यक्षप्रश्न : नारळ कोण देईल फोडून?
चष्मा उंचावून म्हणालो,
जनरल नॉलेजी सुरात
म्हटले, देऊ थोडके ज्ञान
जुन्यापुराण्या विटक्या पिढीला,
होऊ ‘कनेक्ट’ जरा
आधुनिक रीतीने
म्हणालो खाकरून :
‘‘ऐक ना, आई...
इम्पॉर्टंट आहे!
तुला माहीत आहे का
ॲना जार्विस ?
जिने सुरू केला
मदर्स डे नावाचा
एक अद्वितीय दिवस,
आरक्षित केला
आख्खा एक दिवस,
जगाच्या रंगबिरंगी कॅलिंडरात
रेखला एक चौकोन
जगातल्या
तमाऽऽऽऽम मातांसाठी!’’
...तरीही आईचे चाललेच होते
काहीतरी त्या भिक्कारड्या,
भवतापात लिडबिडलेल्या
शेगडीच्या कडेकडेने.
नव्हतेच तिचे लक्ष काही, कुठे.
‘‘मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी
सारे जग आपल्या आयांना
आठवते, आई!
देतात तिला सुंदरशी मखमली
ग्रीटिंग कार्डे, करतात
लाँग डिस्टन्स कॉल स्वखर्चाने,
किंवा पाठवतात ईमेल वगैरेही!
किंवा म्हणतात सुरेल गाणी
प्रेमस्वरूप आईच्या थोरवीची,
तिच्या निरंतर असण्याची,
किंवा गाळतात आसवे,
तिच्या निरंतर नसण्याची...
होतात दिवसभरासाठ कृतकृत्य,
आठवतात तिचा परिचित अंगगंध
तिचा दमला भागला
सेल्फलेस चेहरा...
तिच्या खमक्या पाठकण्याआडून
दडून पाहिलेले क्येवढेतरी
अनोळखी चेहरे आणि प्रसंग...
‘‘ऐकत्ये आहेस ना, आई?’’
म्हटले तिला, तर म्हणाली :
‘‘येवढा नारळ देरे फोडून!!’’
सपशेल दुर्लक्ष करत म्हणालो :
‘‘कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून
या दिवशी आईला फुले
देण्याची पद्धत आहे जगात,
ही घे...घे ना, आई!’’
कवठी चाफ्याचे दोन टप्पोरे
गंधकळे तिच्या सुरकुतलेल्या
तळहाती ठेवताना
च्यायला, उगीच आले भडभडून...
स्तंभित होत्साती बघत राहिली,
ती त्या कवठी चाफ्याकडे,
मग खळखळून हसत
म्हणाली येवढेच :
‘‘...गाढवच आहेस!’’
--- ब्रिटीश नंदी
"कविता मना-मनातली"
[British Nandi - Poet - Kavita Mana Manatali ]
No comments:
Post a Comment