Monday, March 30, 2015

बालकवींनी चित्रीत केलेली उदासीनता आपल्या आयुष्यातील काही क्षणांना किती चपखल बसते नाही... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...

"निमित्तमात्र" या माझ्या कवितासंग्रहाचं कवी विराज चव्हाण यांनी महासागर वृत्तपत्रासाठी केलेलं परिक्षण... कवितासंग्रहाची दखल घेतल्याबद्दल ’महासागर’च्या संपादकांचे मन:पूर्वक आभार!

Friday, March 27, 2015

ज्यांना आपण ’आपला अभिनेता’ म्हणून ओळखतो, कींबहुना हिंदीवाल्यांच्या गर्दीतला स्वत:चा चेहरा म्हणून समजतो त्या नाना पाटेकरांची भावपूर्ण रचना... नेमाने या ब्लॉगवर आपण विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेत असता... तुम्हालाही आमच्या या काव्य चळवळीत सहभागी व्हायचे असल्यास "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो...
तसेच "निमित्तमात्र" या माझ्या कवितासंग्रहाच्या तृतीय आवृतीचा प्रकाशन सोहळा साधू-संतांच्या उपस्थितीत उद्या श्रीराम नवमीला भक्तिमय वातावरणात होत आहे, या प्रकाशन सोहळ्याचे सर्वांना हार्दिक
"निमंत्रण"
// काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा //
संवेदना प्रकाशन प्रकाशित,
गीतेश गजानन शिंदे लिखित
"निमित्तमात्र" या कवितासंग्रहाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन
गुरुवर्य भक्तराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने !
प्रकाशन समारंभ : श्रीराम नवमी, शनिवार दि. २८ मार्च २०१५
वेळ : सकाळी ९ वा.
स्थळ : भक्तवात्सल्य आश्रम, कांदळी, आळेफाटा, जुन्नर
*सदर प्रकाशन सोहळ्यास काव्यरसिकांची उपस्थिती प्रार्थनीय*


Wednesday, March 25, 2015

आज कविवर्य ग्रेस यांचा स्मृतीदिन... त्यांच्या स्मृतीस "कविता मना-मनातली"कडून विनम्र अभिवादन... त्यांच्याच एका कवितेतून आज ग्रेसमय होवूयात... "कविता मना-मनातली"च्या या काव्यचळवळीत सहभागी होण्यासाठी हा ब्लॉग आणि शेअर करायला विसरु नका मित्रहो!!


Tuesday, March 24, 2015

महाराष्ट्र टाईम्स या आघाडीच्या वृत्तपत्रात "निमित्तमात्र" या माझ्या कवितासंग्रहाचे योगिनी राऊळ यांनी केलेले परिक्षण आले आहे. आजच्या काळाची कविता असं शीर्षक देऊन मटाने कवितासंग्रहाचा गौरवच केला आहे त्याबद्दल संपादकांचे मन:पूर्वक आभार!

Monday, March 23, 2015

आज शहिद दिवस... भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या वीर मरण पुढच्या पिढ्यांच्याही लक्षात राहिल. परंतु सीमेवर असे अनेक जवान शहिद होतात ज्यांची नाव आपल्याला माहितही नसतात. अशाच अनाम विरांना "कविता मना-मनातली"ची काव्यवंदना!!

Friday, March 20, 2015

आज जागतिक कविता दिनाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत एक आनंदाची बातमी आपल्याला सांगाविशी वाटतेय... संवेदना प्रकाशन प्रकाशित "निमित्तमात्र" या माझ्या पहिल्या कवितासंग्रहाला तुम्ही सर्वांनी जो भरभरुन प्रतिसाद दिलात त्यामुळेच आज या शुभदिनी कवितासंग्रहाची तिसरी आवृती प्रसिध्द होत आहे. चार महिन्यात मराठी काव्यसंग्रहाची तिसरी आवृती प्रकाशित होणं हा एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. त्याबद्दल तुम्हा काव्यरसिकांच्या मी ऋणात राहणं पसंत करेन. संवेदना प्रकाशनचे प्रकाशक श्री. नितीन हिरवे यांचे आभार. तसेच कवितांचे अंतरंग मुखपृष्ठावर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून जिवंत करणा-या चित्रकार, कवी श्री. विजयराज बोधनकर यांचे विशेष आभार. प्रथम आवृतीचे प्रकाशन ज्यांच्या शुभहस्ते झाले ते कवी, गजलकार श्री. वैभव जोशी, ज्यांच्या प्रस्तावनेतुन मिळालेल्या आशीर्वादाने कवितासंग्रह नवी भरारी घेण्यास सज्ज झाला त्या कविवर्य प्रसाद कुलकर्णी आणि प्रसिध्द सिनेदिग्दर्शक विजू माने यांचे मन:पूर्वक आभार! नव्या आवृतीमध्ये कविवर्य प्रविण दवणे आणि कविवर्य सतीश सोळांकूरकर यांच्या अभिप्रायाचा समावेश केला गेला आहे. तिस-या आवृतिचा प्रकाशन समारंभ माझ्या गुरुस्थानी येत्या श्रीराम नवमीच्या शुभदिनी दिनांक २८ मार्च २०१५ रोजी भक्तवात्सल्य आश्रम, कांदळी, जुन्नर येथे होणार असून सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. आपलं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या कवितेवर असंच उदंड राहू देत ही विनंती.
--- गीतेश गजानन शिंदे
संपर्क : ९८२०२७२६४६
ग्रेस तुमच्या कवितेशिवाय "कविता मना-मनातली" ब्लॉगला ग्रेस नाही... सहमत असाल तर कविता आणि ब्लॉग जरूर लाईक व शेअर करा मित्रांनो!!

Thursday, March 19, 2015

आईचं काळीज बहिणाबाईंशिवाय दुसरं कुणी इतक्या सहजपणे सांगू शकेल काय ? आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...

Wednesday, March 18, 2015

गालिब काय म्हणावं या माणसाला ? सारी विशेषणं, अलंकार कमी पडतील... आपल्या भावनांचं वर्णन त्यांच्या शेर मध्ये नक्कीच सापडतं... सहमत असाल तर "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...

Tuesday, March 17, 2015

महाराष्ट्रात अवकाळी पावसाने आणि गारपीठीने शेतक-यांचे कंबरडे पुन्हा मोडले आहे. मागच्याच पंचनाम्याची मदत अजून मिळालेली नाही. सरकार बदलंल पण परिस्थिती नाही. यावरंच भाष्य गीतेश गजानन शिंदे यांची त्रिवेणी... आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...

Monday, March 16, 2015

जगजीत सिंग यांच्या आवाजाने अजरामर झालेलं प्रसिध्द शायर, गीतकार जावेद अख्तर यांची ही गजल खास "कविता मना-मनातली"च्या रसिकांसाठी... गजल आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...

Sunday, March 15, 2015

चंद्रशेखर सानेकर यांच्या गजलेतील भाव तुमच्या काळजाला भिडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो... 

Saturday, March 14, 2015

आज गजलसम्राट सुरेश भट यांचा स्मृतीदिन. "कविता मना-मनातली"कडून या मराठी साहित्याच्या अलंकारास मन:पूर्वक वंदन. या निमित्ताने काव्य रसिकांच्या काळजावर कोरली गेलेली गजल सादर करतोय... "कविता मना-मनातली" ब्लॉगवर सुरेश भटांच्या गजले इतकंच प्रेम राहू देत. हा ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरु नका दोस्तांनो...

Friday, March 13, 2015

कवी दुष्यंत कुमार यांच्या विचारांशीच "कविता मना-मनातली"ची नाळ जुळतेय... फक्तं आमच्याच कविता वाचाव्यात हा आमचा उद्देश नाही म्हणूनच उत्तमोत्तम मराठी, हिंदी कविता आम्ही फेसबुकवरील पेजवर आणि या ब्लॉग्वर सादर करत असतो... आमचा हा छोटासा प्रयत्न आवडल्यास हा ब्लॉग शेअर करायला विसरु नका मित्रांनो...

Thursday, March 12, 2015

कवी सौमित्र यांची ही मना-मनातली कविता... आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...

Wednesday, March 11, 2015

नुसते हाती हात असण्याचाही किती आधार असतो... कवी अनिलांची आणीबाणी कविता म्हणजे एक प्रकारची आभाळमायाच... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...

Monday, March 9, 2015

आज कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिवस... "कविता मना-मनातली" ब्लॉगतर्फे कविवर्य मंगेश पाडगावकरांना अनंत शुभेच्छा!! या निमित्ताने त्यांचीच एक कविता सादर करतोय... ही कविता म्हणजे जीवनगाणेच... प्रत्येक ओळीतून उर्जा आणि स्कारात्मक दृष्टीकोन मिळत जातो या कवितेतून... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...

Sunday, March 8, 2015

काल जागतिक महिला दिन साजरा झाला. अर्थात महिलांचे प्रश्न त्याने काही सुटले नाहीत. कविवर्य अशोक नायगावकर यांची ही बोलकी कविता... आवडल्यास हा ब्लॉग शेअर आणि लाईक करायला विसरु नका मित्रांनो...

आज ’निमित्तमात्र’ या माझा कवितासंग्रह प्रकाशित होऊन चार महिने पूर्ण झाले. ९ नोव्हेंबर २०१४  रोजी प्रकाशित झालेलं माझं हे पहिलंच पुस्तक तुम्हा रसिकांनी उचलून धरलत, अनेक मान्यवरांचे अशीर्वाद त्यास मिळाले. तुमच्या पत्रांतून, फेसबुक, व्हॉट्स अप वरील प्रतिक्रियांमधून माझीच कविता मला नव्याने उलगडली. प्रथम आवृत्ती दहा दिवसातच संपली आणि आता चार महिने पूर्ण होईस्तोवर दुसरी आवृत्तीही विकली गेली. त्यामुळे लवकरच निमित्तमात्रची तिसरी आवृत्ती ’संवेदना प्रकाशन’कडून प्रसिध्द होत आहे. तुमचं प्रेम माझ्या कवितेवर असंच राहू देत ही प्रेमळ विनंती.
--- गीतेश गजानन शिंदे
संपर्क : ९८२०२७२६४६

आज जागतिक महिला दिन... परंतु ख-या अर्थाने असे दिवस साजरे करून स्त्रीमधील शक्तीलाच आपण दीन करुन टाकले आहे. भांडवलदार तर हा दिवसही एनकॅश करायला पुढे मागे पाहत नाही. म्हणूनच अनेक दुकानांत महिला दिनाचे विशेष सेल लागलेत. हे असं भावनांना कॅश करत जगणं यालाच जागतिकीकरण म्हणायचं... पुरुषाला माणूस म्हणून घडविण्याच्या प्रक्रियेत स्त्रीचा वाटा हा फार मोठा असतो. स्त्रीयांकडे माणूस म्हणून किती जण पाहतात हा शोधाचा विषय आहे. मूळात स्त्रीयाच स्वत:ला अबला म्हणवून घेण्यात धन्यता मानतेय असं चित्र दिसतंय. कवी गीतेश गजानन शिंदे यांच्या ’वुमन्स डे’ या कवितेतून आजची स्त्री संवाद करु पाहतेय कालच्या स्त्रीशी आणि नकळत मांडत जातेय सारी परिस्थिती... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करुन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका मित्रांनो...

Saturday, March 7, 2015

आज तुकाराम बीज. तुकोबारायांच्या विचारांना आणि कार्याला "कविता मना-मनातली"कडून विनम्र अभिवादन ! या निमित्ताने कवी दासू वैद्य यांची कविता... आवडल्यास "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो...

Friday, March 6, 2015

धुळवडीचा आनंद व्दिगुणित करूयात कविवर्य सुरेश भटांच्या सुंदर शब्दांनी... "कविता मना-मनातली"कडून सर्वांना रंगपंचमीच्या अनंत शुभेच्छा !! "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करून ही होळी काव्यमय करा मित्रांनो...

Wednesday, March 4, 2015

किती जणांना कवी आरती प्रभूंची ही कविता आपल्या भावनांचं प्रतिबिंब वाटते ? कविता आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो... 
मराठी कवितेत रोमॅंटीसिझम नाही असं कुठे तरी म्हटल जातं त्याला खोडून काढणारी कवयित्री अरूणा ढेरे यांची ही कविता... आवडल्यास हा ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो...

Monday, March 2, 2015

Hey friends click on this link to Listen the special show recorded for Marathi Bhasha Divas on Radio Mirchi 98.3 FM with RJ Jeeturaaj!!!

http://www.radiomirchi.com/mumbai/whats-hot/audio/listen/a-professor-poet-narrates-a-touching-poem-in-marathi-on-mumbai-ki-awaaz-jeeturaaj-on-the-occasion-of-marathi-rajyabhasha-divas/28969?fb_ref=Default
Geetesh Shinde at Radio Mirchi 98.3FM on the show of RJ Jeeturraj for Marathi Bhasha Divas !!
गुलजारजींच्या त्रिवेण्या आपल्याला अनुभुतिच्या पातळीवर वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात... आता हीच त्रिवेणी पहा ना...