आज जागतिक महिला दिन... परंतु ख-या अर्थाने असे दिवस साजरे करून स्त्रीमधील शक्तीलाच आपण दीन करुन टाकले आहे. भांडवलदार तर हा दिवसही एनकॅश करायला पुढे मागे पाहत नाही. म्हणूनच अनेक दुकानांत महिला दिनाचे विशेष सेल लागलेत. हे असं भावनांना कॅश करत जगणं यालाच जागतिकीकरण म्हणायचं... पुरुषाला माणूस म्हणून घडविण्याच्या प्रक्रियेत स्त्रीचा वाटा हा फार मोठा असतो. स्त्रीयांकडे माणूस म्हणून किती जण पाहतात हा शोधाचा विषय आहे. मूळात स्त्रीयाच स्वत:ला अबला म्हणवून घेण्यात धन्यता मानतेय असं चित्र दिसतंय. कवी गीतेश गजानन शिंदे यांच्या ’वुमन्स डे’ या कवितेतून आजची स्त्री संवाद करु पाहतेय कालच्या स्त्रीशी आणि नकळत मांडत जातेय सारी परिस्थिती... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करुन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका मित्रांनो...
No comments:
Post a Comment