आज ’निमित्तमात्र’ या माझा कवितासंग्रह प्रकाशित होऊन चार महिने पूर्ण झाले. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी प्रकाशित झालेलं माझं हे पहिलंच पुस्तक तुम्हा रसिकांनी उचलून धरलत, अनेक मान्यवरांचे अशीर्वाद त्यास मिळाले. तुमच्या पत्रांतून, फेसबुक, व्हॉट्स अप वरील प्रतिक्रियांमधून माझीच कविता मला नव्याने उलगडली. प्रथम आवृत्ती दहा दिवसातच संपली आणि आता चार महिने पूर्ण होईस्तोवर दुसरी आवृत्तीही विकली गेली. त्यामुळे लवकरच निमित्तमात्रची तिसरी आवृत्ती ’संवेदना प्रकाशन’कडून प्रसिध्द होत आहे. तुमचं प्रेम माझ्या कवितेवर असंच राहू देत ही प्रेमळ विनंती.
--- गीतेश गजानन शिंदे
संपर्क : ९८२०२७२६४६
--- गीतेश गजानन शिंदे
संपर्क : ९८२०२७२६४६
No comments:
Post a Comment