Sunday, September 27, 2015
Sunday, August 23, 2015
आज आद्य कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिन. या निमित्ताने काव्य रसिकांना त्यांच्याच एका कवितेची "कविता मना-मनातली"कडून पर्वणी... विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रहो...
[Bahinabai Chadhari - Poet - Kavita Mana Manatali]
[Bahinabai Chadhari - Poet - Kavita Mana Manatali]
Monday, August 17, 2015
नाही म्हंटलं तरी पहिलं प्रेम अनवट वाटेने मनात रुंजी घालतंच असतं... प्रेम आणि विरह या भावना नव्या नाहीत पण तरीही विरह कवितांमध्ये कविवर्य वसंत बापटांची ’फुंकर’ कविता अग्रगण्यच म्हणायला हवी... मनाचं भाव-विश्व, घुसमट प्रस्तुत कवितेतून अगदी सोप्या शब्दांत उलगडली आहे... कविता आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...
[Vasant Bapat - Poet - Kavita Mana Manatali]
[Vasant Bapat - Poet - Kavita Mana Manatali]
Saturday, August 15, 2015
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! स्वराज्य मिळून ६९ वर्ष झाली पण सुराज्य अजूनही मिळालेले नाही... उलट आज भारताला अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे... ईशान्येला चीन करत असलेली घुसखोरी आणि तिथे काश्मिरमध्ये पाकिस्तांनी मांडलेला उच्छाद... डॉलरच्या बदल्यात रुपायाचं अवमुल्यन आणि वाढत जाणारी आर्थिक विषमता... किती किती प्रश्न आणि बघ्याच्या भूमिकेतले आपले सरकार... कारण आपणच मेलो आहोत म्हणून स्वातंत्र्यदिनाचा अर्थ सार्वजनिक सुट्टी असा घेतो... असंच सुरू राहिलं तर पुन्हा पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही... तसेही आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य अजूनही मिळालेले नाही आणि तिच विषमता कवितेतून मांडलिये कवी मनीष महेंद्र तपासे यांनी... निदान सामाजिक जाणिव म्हणून तरी ही कविता शेअर करा...कविता आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...
Saturday, August 1, 2015
काही नाती जन्मत:च आपल्यासोबत रक्ताने बांधलेली असतात... पण आयुष्याच्या वळणावर नवी नाती जोडली जातात... आणि असं एक जिवाभावाचं नातं म्हणजे मैत्रीचं नातं... ज्यांच्यासोबत आपण हसतो...रडतो... आणि ख-या अर्थाने खुलतो... खरं म्हणजे मैत्रीचा कोणताही दिवस नसतो... हे नातं आपसुक फुलत जातं... पण या निर्मळ नात्याशी अजून घट्टं होण्याकरता कहीतरी निमित्तं हवंच ना... म्हणूनच कदाचित हा "मैत्रीदिन"... "कविता मना-मनातली"ला तुम्हा रसिक मित्रांकडून भरभरून प्रेम मिळालं... आपल्या मित्रत्वाला या दिनानिमित्तं सलाम आणि शुभेच्छा खास कवी मनीष तपासे यांच्या कवितेतून... आपणही हा दिवस आमच्यासोबत साजरा करा "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करून...
[ Manish Tapase - Poet - Kavita Mana Manatali ]
[ Manish Tapase - Poet - Kavita Mana Manatali ]
Thursday, July 30, 2015
गुरुर्ब्रम्हागुरुर्विष्णु! गुरुर्देवो महेश्वरा!!
गुरु :साक्षात् परब्रम्ह! तस्मै श्री गुरुवे नम !!
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा या निर्मळ काव्यातून देवूयात ज्यात श्री.भक्तराज महाराजांनी स्वामींची महति वर्णिली आहे... "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका मित्रांनो...
गुरु :साक्षात् परब्रम्ह! तस्मै श्री गुरुवे नम !!
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा या निर्मळ काव्यातून देवूयात ज्यात श्री.भक्तराज महाराजांनी स्वामींची महति वर्णिली आहे... "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका मित्रांनो...
कवी कालिदास मंडळ, बार्शी सोलापूर या संस्थेचा तेविसावा ’मेघदूत पुरस्कार’ संवेदना प्रकाशन प्रकाशित माझ्या ’निमित्तमात्र’ या कवितासंग्रहास जाहिर झाला. जेष्ठ साहित्यिका मा. निर्मला मठपती आणि प्रख्यात कवी श्री. मनोज बोरगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याची ही काही क्षणचित्र. या निमित्ताने सर्व काव्य-रसिकांनी माझ्या कवितेवर जो विश्वास दर्शवला त्यांचे मन:पुर्वक आभार मानतो.
--- गीतेश गजानन शिंदे
--- गीतेश गजानन शिंदे
Tuesday, July 7, 2015
काल-परवाच शाळेत जाऊ न शकणा-या मुलांचे गाजावाजा करत सर्वेक्षण करण्यात आले... शिक्षण महाग होत चाललंय नि दर्जा बद्दल तर बोलायलाच नको... इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकणारी आणि शिकवणारी माणुसकी शुन्य नविन पिढी तयार होतेय... आपली भाषा घरात बोलणंही दूरापास्त होऊन बसलंय... हे झालं शहरातलं... पण गावात मुलं आहेत तर शिक्षक नाहीत ही परिस्थिति स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनी सुध्दा बदललेली नाही... आणि जिथे शिक्षक आहेत तिथे मुलं शेतमजूर म्हणून राबताहेत... हा समतोल तर कधीच साधता येणार नाही... फक्तं समित्या आणि अहवाल या कात्रीत शिक्षण अडकून पडलंय... याच संदर्भातली कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांची एक अप्रतिम कविता...आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो कारण हा प्रपंच तुम्हालाच वाढवायचाय...
[ Narayan Kulkarni Kavathekar - Poet - Kavita Mana Manatali ]
[ Narayan Kulkarni Kavathekar - Poet - Kavita Mana Manatali ]
Sunday, June 21, 2015
आज ’फादर्स डे’ निमित्त माझ्या ’आई-बाप’ या कवितेद्वारे वडीलकीच्या नात्याला आदरयुक्त सलाम! आपणही या कवितेद्वारे आपल्या बाबांना शुभेच्छा द्यायला विसरु नका मित्रांनो... तसेच विविध कवितांच्या सुखावणा-या उजळणीसाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो...
"आई...बाप"
आईच्या कविता वाचताना
विचार आला की,
आई असते आपलं सर्वस्व,
तेच असतं आपलं
पहिलं-वहिलं नातं
अन् असते तोंड ओळख जगाशी...
किती सहजतेने आपल्याला
स्वत:त रुजवणारी आई
असते मूळासारखी,
ज्यावर फुलत जातं
आपलं पान न् पान
पण या मुळाला घट्टं आधार देणारी
’बाप’ नावाची माती
तिला का असं वाळीत टाकतो ?
आई असते ज्योत
करते प्रकाशमान आपलं आयुष्य
जळत राहून स्वत:
तर बाप असतो समई
ज्यात त्याने ओतलेलं असतं
आपल्या घामाचं तेल
पोरांचं आयुष्य उजळवण्यासाठी,
ज्योत सर्वांनाच दिसते
पण समई सुद्धा जळतेच
दिसत नसलं तरी आपल्या शरीरात
त्यांचं रक्तं धावतंच ना !
आई असते रेशमी गोधडी
जिच्या धाग्या-धाग्यांत
दडलेली असते उबदार माया
तर बाप असतो वटवॄक्ष
ज्याच्या आधारावर
बहरते आपली छाया
आई असते कुंभार
करते मातीवर संस्कार
तर बाप असतो चाक
ज्याच्या फिरण्यानेच मिळतो आकार
आई असते चंदनासारखी
तर बाप असतो सहाणेसारखा
जे उगाळतात आपलं आयुष्य
मुलांची स्वप्नं सुगंधी करण्यासाठी,
चंदनाचं झिजणं सर्वांनाच दिसतं
पण सहाणसुध्दा आतल्या आत झिजतेच ना
आईच्या कविता वाचताना
विचार आला,
आई असते आपलं सर्वस्व
तर बापही असतो
घरा-दाराचं अस्तित्वं
--- गीतेश गजानन शिंदे
( निमित्तमात्र संग्रहातून )
"कविता मना-मनातली"
संपर्क - ९८२०२७२६४६
"आई...बाप"
आईच्या कविता वाचताना
विचार आला की,
आई असते आपलं सर्वस्व,
तेच असतं आपलं
पहिलं-वहिलं नातं
अन् असते तोंड ओळख जगाशी...
किती सहजतेने आपल्याला
स्वत:त रुजवणारी आई
असते मूळासारखी,
ज्यावर फुलत जातं
आपलं पान न् पान
पण या मुळाला घट्टं आधार देणारी
’बाप’ नावाची माती
तिला का असं वाळीत टाकतो ?
आई असते ज्योत
करते प्रकाशमान आपलं आयुष्य
जळत राहून स्वत:
तर बाप असतो समई
ज्यात त्याने ओतलेलं असतं
आपल्या घामाचं तेल
पोरांचं आयुष्य उजळवण्यासाठी,
ज्योत सर्वांनाच दिसते
पण समई सुद्धा जळतेच
दिसत नसलं तरी आपल्या शरीरात
त्यांचं रक्तं धावतंच ना !
आई असते रेशमी गोधडी
जिच्या धाग्या-धाग्यांत
दडलेली असते उबदार माया
तर बाप असतो वटवॄक्ष
ज्याच्या आधारावर
बहरते आपली छाया
आई असते कुंभार
करते मातीवर संस्कार
तर बाप असतो चाक
ज्याच्या फिरण्यानेच मिळतो आकार
आई असते चंदनासारखी
तर बाप असतो सहाणेसारखा
जे उगाळतात आपलं आयुष्य
मुलांची स्वप्नं सुगंधी करण्यासाठी,
चंदनाचं झिजणं सर्वांनाच दिसतं
पण सहाणसुध्दा आतल्या आत झिजतेच ना
आईच्या कविता वाचताना
विचार आला,
आई असते आपलं सर्वस्व
तर बापही असतो
घरा-दाराचं अस्तित्वं
--- गीतेश गजानन शिंदे
( निमित्तमात्र संग्रहातून )
"कविता मना-मनातली"
संपर्क - ९८२०२७२६४६
Tuesday, June 9, 2015
कवयत्रि धीरूबेन पटेल यांचा ’ किचन पोएम्स ’ या उत्कॄष्ट काव्यसंग्रहाचा अनुवाद सध्या वाचनात आल्या... प्रत्येक कविता म्हणजे आपल्याच घरातिल बारकावे तेही स्वयंपाक घराच्या नजरेतून पाहिलेले... गृहिणिला समजून घेण्यासाठी एकदा तरी हा काव्यसंग्रह वाचावा... त्याचीच एक झलक म्हणून ही कविता... आवडल्यास " कविता मना-मनातली " पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...
Sunday, June 7, 2015
संवाद-विसंवादाची कविता
’मी मराठी’ या वृत्तपत्रातील सप्तमी पुरवणीत आज "निमित्तमात्र" या माझ्या कवितासंग्रहाचे आलेले परिक्षण...
संवाद-विसंवादाची कविता
संवाद-विसंवादाची कविता
Sunday, May 31, 2015
आज कवी सतीश सोळांकूरकर यांचा वाढदिवस यानिमित्ताने त्यांची ’मातीचा बाहुला’ ही ह्रद्याला भिडणारी कविता... सतीश दादांना "कविता मना-मनातली" परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! कविता नक्कीच आवडेल याची खात्री आहे तेव्हा "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका मित्रांनो...
[ Satish Solankurkar - Poet - Kavita Mana Manatali ]
[ Satish Solankurkar - Poet - Kavita Mana Manatali ]
Tuesday, May 26, 2015
दिल पे मिला हुआ जख्म मिटाएं न मिटता हें... याँदों के साँयें मे जिने का गम ही नसिब होता हें उसके छोड जाने के बाद... शायर अदीम हाश्मी की दिल का दर्द बयाँ करनेवाली गजल... पसंद आएं तो "कविता मना-मनातली" पेज लाईक और शेअर करना ना भूलियेगा दोस्तो... कुछ शब्दों के मानें जो आप जानना चाहो शायद...
चार सू = In four directions, In all directions
गिलाफ़ = Cover, Envelope
[ Aadim Hashmi - Poet - Kavita Mana Manatali ]
चार सू = In four directions, In all directions
गिलाफ़ = Cover, Envelope
[ Aadim Hashmi - Poet - Kavita Mana Manatali ]
Sunday, May 17, 2015
आईवर किती विविधतेने लिहिलं गेलंय... आणि कितिही लिहिलं तरी कमीच वाटतं... आई आणि मुलगी यामधील हळुवार संवाद कवी संजय चौधरी यांनी किती सहजतेने मांडलाय... कविता तुमच्या ह्रद्यापर्यंत पोहचल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग फॉलो आणि शेअर करायला विसरू नका दोस्तांनो...
[ Sanjay Chaudhary - Poet - Kavita Mana Manatali ]
[ Sanjay Chaudhary - Poet - Kavita Mana Manatali ]
Tuesday, May 12, 2015
मुंबईत रोज किमान एकदा तरी आपल्या घरी पाणी येतं, म्हणूनच कदाचित आपल्याला पाण्याची तेवढीशी किंमत नाही. परंतु महाराष्ट्राच्या उर्वरित भागात भीषण परिस्थिती आहे आणि दिवसेंदिवस ती गंभीर होणार आहे... अशावेळी पाण्यासाठी प्रार्थना करण्यावाचून काहीच पर्याय नाही... कवी नलेश पाटील यांची ही अशीच एक आर्त प्रार्थना "कविता मना-मनातली "च्या वाचकांसाठी... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग शेअर आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून हा हुंकार दूरवर पोहोचेल...
[ Nalesh Patil - Poet - Kavita Mana Manatali ]
[ Nalesh Patil - Poet - Kavita Mana Manatali ]
Monday, May 11, 2015
काल फेसबुक आणि व्हॉट्स अपवर अनेकांनी ’मदर्स डे’ अगदी जोषात साजरा केला... आपल्या आईचा जूनासा फोटो डीपी म्हणूनही ठेवला किंवा आईसोबतचे बालपणीचे फोटो शेअर करुन त्यात तिच्या कष्टाचा, त्यागाचा यथोचित उल्लेखही केला. काहींनी आपल्या गेलेल्या आईच्या आठवणीत अश्रूही ढाळले. तर आमच्यासारख्या काहींनी कविताही शेअर केल्या... पण मूळात आपण जीचे फोटो शेअर केले, जीच्यासाठी स्टेट्सचे रकाने भरले ती ’आई’ मात्र या सर्वांपासून दूर स्वत:चं आईपण न मिरवता रोजचंच आयुष्य जगत राहिली... या व्हर्चुअल युगात आईपण सुध्दा एनकॅश केलं जातंय आणि आपण सर्व कॉपी पेस्ट आणि कर फॉरवर्ड यातंच समाधान मानतोय. अशावेळी "कविता मना-मनातली"ला शेअर करावीशी वाटतेय कवी ब्रिटीश नंदी यांची पुढील कविता...
आळसवारच्या वर्तमानपत्राची
वैचारिक घडी घालत
येऊन उभा राहिलो,
स्वयंपाकघराच्या चौकटीत,
आणि, सांगू लागलो काहीबाही
असे-तसे, यंव-त्यंव...
तेव्हा, स्वयंपाकाच्या ओट्याला
ओठंगून आई करीत होती गोळा
कांद्याची सैरभैर साले,
करीत होती साफ
गॅसच्या शेगडीची तेलाने
बुजलेली पुरातन भोके...
सोडवीत होती नव्या दिवसाचा
नवा यक्षप्रश्न : नारळ कोण देईल फोडून?
चष्मा उंचावून म्हणालो,
जनरल नॉलेजी सुरात
म्हटले, देऊ थोडके ज्ञान
जुन्यापुराण्या विटक्या पिढीला,
होऊ ‘कनेक्ट’ जरा
आधुनिक रीतीने
म्हणालो खाकरून :
‘‘ऐक ना, आई...
इम्पॉर्टंट आहे!
तुला माहीत आहे का
ॲना जार्विस ?
जिने सुरू केला
मदर्स डे नावाचा
एक अद्वितीय दिवस,
आरक्षित केला
आख्खा एक दिवस,
जगाच्या रंगबिरंगी कॅलिंडरात
रेखला एक चौकोन
जगातल्या
तमाऽऽऽऽम मातांसाठी!’’
...तरीही आईचे चाललेच होते
काहीतरी त्या भिक्कारड्या,
भवतापात लिडबिडलेल्या
शेगडीच्या कडेकडेने.
नव्हतेच तिचे लक्ष काही, कुठे.
‘‘मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी
सारे जग आपल्या आयांना
आठवते, आई!
देतात तिला सुंदरशी मखमली
ग्रीटिंग कार्डे, करतात
लाँग डिस्टन्स कॉल स्वखर्चाने,
किंवा पाठवतात ईमेल वगैरेही!
किंवा म्हणतात सुरेल गाणी
प्रेमस्वरूप आईच्या थोरवीची,
तिच्या निरंतर असण्याची,
किंवा गाळतात आसवे,
तिच्या निरंतर नसण्याची...
होतात दिवसभरासाठ कृतकृत्य,
आठवतात तिचा परिचित अंगगंध
तिचा दमला भागला
सेल्फलेस चेहरा...
तिच्या खमक्या पाठकण्याआडून
दडून पाहिलेले क्येवढेतरी
अनोळखी चेहरे आणि प्रसंग...
‘‘ऐकत्ये आहेस ना, आई?’’
म्हटले तिला, तर म्हणाली :
‘‘येवढा नारळ देरे फोडून!!’’
सपशेल दुर्लक्ष करत म्हणालो :
‘‘कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून
या दिवशी आईला फुले
देण्याची पद्धत आहे जगात,
ही घे...घे ना, आई!’’
कवठी चाफ्याचे दोन टप्पोरे
गंधकळे तिच्या सुरकुतलेल्या
तळहाती ठेवताना
च्यायला, उगीच आले भडभडून...
स्तंभित होत्साती बघत राहिली,
ती त्या कवठी चाफ्याकडे,
मग खळखळून हसत
म्हणाली येवढेच :
‘‘...गाढवच आहेस!’’
--- ब्रिटीश नंदी
"कविता मना-मनातली"
[British Nandi - Poet - Kavita Mana Manatali ]
आळसवारच्या वर्तमानपत्राची
वैचारिक घडी घालत
येऊन उभा राहिलो,
स्वयंपाकघराच्या चौकटीत,
आणि, सांगू लागलो काहीबाही
असे-तसे, यंव-त्यंव...
तेव्हा, स्वयंपाकाच्या ओट्याला
ओठंगून आई करीत होती गोळा
कांद्याची सैरभैर साले,
करीत होती साफ
गॅसच्या शेगडीची तेलाने
बुजलेली पुरातन भोके...
सोडवीत होती नव्या दिवसाचा
नवा यक्षप्रश्न : नारळ कोण देईल फोडून?
चष्मा उंचावून म्हणालो,
जनरल नॉलेजी सुरात
म्हटले, देऊ थोडके ज्ञान
जुन्यापुराण्या विटक्या पिढीला,
होऊ ‘कनेक्ट’ जरा
आधुनिक रीतीने
म्हणालो खाकरून :
‘‘ऐक ना, आई...
इम्पॉर्टंट आहे!
तुला माहीत आहे का
ॲना जार्विस ?
जिने सुरू केला
मदर्स डे नावाचा
एक अद्वितीय दिवस,
आरक्षित केला
आख्खा एक दिवस,
जगाच्या रंगबिरंगी कॅलिंडरात
रेखला एक चौकोन
जगातल्या
तमाऽऽऽऽम मातांसाठी!’’
...तरीही आईचे चाललेच होते
काहीतरी त्या भिक्कारड्या,
भवतापात लिडबिडलेल्या
शेगडीच्या कडेकडेने.
नव्हतेच तिचे लक्ष काही, कुठे.
‘‘मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी
सारे जग आपल्या आयांना
आठवते, आई!
देतात तिला सुंदरशी मखमली
ग्रीटिंग कार्डे, करतात
लाँग डिस्टन्स कॉल स्वखर्चाने,
किंवा पाठवतात ईमेल वगैरेही!
किंवा म्हणतात सुरेल गाणी
प्रेमस्वरूप आईच्या थोरवीची,
तिच्या निरंतर असण्याची,
किंवा गाळतात आसवे,
तिच्या निरंतर नसण्याची...
होतात दिवसभरासाठ कृतकृत्य,
आठवतात तिचा परिचित अंगगंध
तिचा दमला भागला
सेल्फलेस चेहरा...
तिच्या खमक्या पाठकण्याआडून
दडून पाहिलेले क्येवढेतरी
अनोळखी चेहरे आणि प्रसंग...
‘‘ऐकत्ये आहेस ना, आई?’’
म्हटले तिला, तर म्हणाली :
‘‘येवढा नारळ देरे फोडून!!’’
सपशेल दुर्लक्ष करत म्हणालो :
‘‘कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून
या दिवशी आईला फुले
देण्याची पद्धत आहे जगात,
ही घे...घे ना, आई!’’
कवठी चाफ्याचे दोन टप्पोरे
गंधकळे तिच्या सुरकुतलेल्या
तळहाती ठेवताना
च्यायला, उगीच आले भडभडून...
स्तंभित होत्साती बघत राहिली,
ती त्या कवठी चाफ्याकडे,
मग खळखळून हसत
म्हणाली येवढेच :
‘‘...गाढवच आहेस!’’
--- ब्रिटीश नंदी
"कविता मना-मनातली"
[British Nandi - Poet - Kavita Mana Manatali ]
Saturday, May 9, 2015
"निमित्तमात्र" हा माझा कवितासंग्रह प्रकाशित होऊन आज सहा महिने पूर्ण झाले. या सहा महिन्यांत अनेक मान्यवर कवींचे, समीक्षकांचे अभिप्राय आणि आशीर्वाद कवितासंग्रहास लाभले. तसेच काव्यरसिकांनी संग्रहाचे भरभरुन स्वागत केले आणि चारच महिन्यांत संग्रहाची तिसरी आवृतिही प्रसिध्द झाली. पत्रांच्या, फेसबुकच्या आणि व्हॉट्स अपच्या माध्यमातून अनेकांनी आपले अभिप्राय कळवले. ते सर्व वाचत असताना कृतकृत्य होतानाच कवितेबद्दल या पुढे अधिक सजग राहण्याची गरज असल्याची जाणिव मनात नेहेमीच अधोरेखित होते. ’संवेदना’ प्रकाशनने माझा कवितासंग्रह प्रकाशित करुन मला काव्य रसिकांसमोर येण्याची संधी दिली त्याबद्दल प्रकाशक श्री. नितिन हिरवे यांचे मन:पूर्वक आभार. "निमित्तमात्र"मधील कवितांचा अचूक ठाव घेऊन साजेसं मुखपृष्ठ आणि रेखाचित्र चित्रित केल्याबद्दल चित्रकार, कवी श्री. विजयराज बोधनकर यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. शेवटी सर्व काव्य रसिकांचे आभार मानून आपले प्रेम असेच माझ्या कवितेवर रहावे हीच अपेक्षा करतो.
Subscribe to:
Posts (Atom)