Saturday, October 8, 2016

इमरोज यांच्या कवितेतून प्रेमाचा अर्थ जाणूयात... विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रहो!!

--- प्रा. गीतेश शिंदे

Wednesday, September 14, 2016

बघता बघता बाप्पाच्या निरोपाचा क्षण आला. आज संध्याकाळी ’पुढल्या वर्षी लवकर या..’ च्या जयघोषात विसर्जनाच्या मोठ्या मिरवणूका निघतील. काहीजण जाता-जाताही पायावर डोकं ठेवून काहीतरी मागून घेतील. पण अशाश्वत गोष्टींपेक्षा शाश्वत गोष्टी बाप्पाकडे मागितल्या तर ? अशीच पार्थना केलीय कविवर्य अशोक कोतवाल यांनी त्यांच्या या प्रस्तुत कवितेतून. हे सृजनाचे दान या बुध्दीदात्याने, कलासक्ताने सा-यांच्याच पदरात घालावे अशी प्रार्थना करून बाप्पाला या वर्षासाठी भक्तीभावाने सप्रेम निरोप देऊयात...
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)


Sunday, September 4, 2016

बघता बघता गणेश चतुर्थी उद्यावर येऊन ठेपली आणि सर्वांची आज लगबग उडालीय आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन येण्यासाठी. काल-परवापर्यंत मुर्तीकाराचा शेवटचा हात त्याच्यावरून फिरला असेल आणि गल्लो-गल्ली त्यांची दुकानं सुध्दा मांडली गेली असतील.  हे सर्व चित्रित करणारी कवी सौमित्र यांची कविता आज "कविता मना-मनातली" ब्लॉगवर प्रसिध्द करत आहे. कविता दिर्घ असल्याने या काव्य-चित्रासोबत संपूर्ण कविता जोडली आहे...

’गणपतीचं दुकान...’

आपापल्या घरमालकांची
वाट पहात बसलेल्या मूर्ती...
कानात...हातात...सोंडात
अडकवून विकत घेणा-यांची ऐपती...
यांना मालक निवडण्याची बंदी,
त्यांना गणपती निवडण्याचं स्वातंत्र्य...
खरंच!
देवालाही स्ट्रगल चुकला नाही अजून...
गर्दीतला कोण कुणाला
दीड, पाच, सात, चौदा किंवा एकवीस दिवस वाटून देईल.
देव असून
त्यांनाही नाही ठाऊक...

आरत्या...सजावट...घमघमाट
फळफळावळं, दुर्वांच्या बागा
सिनेमे, ऑर्केस्ट्रा, नाचगाणी, फुल एन्टरटेन्मेन्ट...
उसंत मिळणार नाही यांना...
वाटून दिलेल्या वास्तव्यात
आणणारेच उचलतील
तो आपला शेवटचा दिवस मानून
वाजतगाजत करतील निरोपार्तीचा स्वीकार समुद्र किनारी...

दूर पाण्यात होडी थांबलेली...
अनेक घरचे एकाच होडीत, बुडण्यासाठी!
आता खूप आत...
बोला ’गणपती बाप्पा... मोरया...’
निघून जातील काही सुखरूप कुठेतरी...
जे थकतील
ज्यांना पोहवणार नाही ते...
सोडून देतील पाण्यात आपला एकेक अवयव...

भरती आल्यावर मग
भरून जाईल किनारा...
पण तेव्हा कुणीही देणार नाही ओळख
कुठल्याही हाताला, पायाला, सोंडेला...
वेण्यांना, फुलांना, मुकुटांना तुटलेल्या...
’पुढल्या वर्षी लवकर या’...च्या घोषात
निघालेले काही
येतीलही किना-यावर दुस-याच दिवशी
ते घोष खरे समजून...
पण मांडव
उखडलेले असतील सा-यांचेच...
मग पुढल्याच भरतीची गाडी धरुन
विदाऊट तिकीट निघून जातील सारे हळूहळू...

पण तरी...

पुढील वर्षी याच दिवसांत हेच सारे गणपती...
दुकानादुकानांतून करतील गर्दी...
हात...सोंडा...माना उंचावून
दाखवतील आपापल्या किंमती...
दरवर्षी हेच
असंच होत राहणार...
माणूस देवाला कंटाळणार नाही
की देव माणसाला...
फक्त माझ्यासारखे सा-याचाच कंटाळा आलेले
कधी देवाची बाजू घेतील
कधी स्वत:ची...

--- सौमित्र @
"कविता मना-मनातली"


Wednesday, August 10, 2016

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी या प्रस्तुत कवितेतून जलचक्राचे यथार्थ शब्द चित्रण केले आहे. विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...
--- प्रा. गीतेश शिंदे
(ठाणे)

Wednesday, August 3, 2016

निसर्गाच्या रुद्रावतारापुढे माणूस हा किती थिटा आहे हे आज पुन्हा सिध्द झाले. अर्थात यात चूक मानवाचीच आहे कारण आपल्याला भरभरून देणा-या निसर्गाला गृहित धरण्याचे आणि ओरबाडण्याचे काम आपण सर्वच करत असतो. या दुर्घटनेमुळे माळीण गावच्या घटनेची आठवण मात्र झाली. त्यावेळी कवी अशोक बागवे यांनी माळीणच्या दुर्घटनेवर लिहिलेली कविता पुन्हा सादर करताना अत्यंत खेद होत आहे.

Monday, August 1, 2016

ओल लागली की सगळेच काठ भिजतात असं नाही... कविवर्य द. भा. धामणस्कर यांच्या प्रस्तुत कवितेतून पाण्याचे न दिसणारे रंग उलगडले आहेत..."कविता मना-मनातली" हे पेज लाईक आणि शेअर करून या चळवळीत सहभागी व्हायला विसरू नका दोस्तहो!
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)

Thursday, July 28, 2016

काही कविता अजरामर असतात... अशीच एक कविवर्य सुरेश भट यांची ही कविता...

Tuesday, July 12, 2016

आषाढी एकादशी जवळ येतेय आणि पंढरपूर वारक-यांनी दुमदुमू लागले आहे. भक्तीरसाने भिजलेल्या भक्तांची कविता कवी अशोकजी परांजपेंनी शब्दबध्द केली आहे. या पेजचा उद्देश केवळ कविता प्रसिद्ध करून मनोरंजन करणं नसून, तर विचार प्रक्रिया सुरू करणं आहे. तुम्ही जर या विचारांशी सहमत असाल तर "कविता मना-मनातली" हे पेज लाईक आणि शेअर करून या चळवळीत सहभागी व्हायला विसरू नका दोस्तहो!
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)


Saturday, July 9, 2016

आम्ही सुध्दा खूप पावसाळे पाहिलेत... असं किती सहज बोलून जातो आपण. पण त्याला किती सुंदर उत्तर दिलंय चंद्रशेखर गोखले यांनी या चारोळीतील प्रश्नातून... विविध आशयांच्या, विषयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका दोस्तहो...
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)
# Chandrashekhar Gokhale - Charoli  @Kavita Mana Manatali


Wednesday, July 6, 2016

कविवर्य अशोक नायगावकरांची भांडण ही कविता तुम्हा काव्य रसिकांची अभिरुची संपन्न करण्यासाठी... विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रहो...
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)

#Poet - Ashok Naygavakar - Bhadan - @ Kavita Mana Manatali

Tuesday, July 5, 2016

आजपासून आषाढ महिन्यास प्रारंभ झाला... कविवर्य ना. धो. महानोर यांच्या कवितेतून त्याचे स्वागत आपण करूयात
# Na. Dho. Mahanor @ Kavita Mana Manatali

Monday, July 4, 2016

कविवर्य ग. दी. माडगळूकर यांच्या या प्रस्तुत कवितेतून निसर्गाच्या जलचक्राची काव्यमय मांडणी केलीय... विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रहो.
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)
# Ga. Di. Madgulkar - Jalchakra. Kavita Mana Manatali

Thursday, June 30, 2016

झाडाने तळ्यात आपलं प्रतिबिंब पाहत आभाळाकडे आपलं मन मोकळं करावं इतका सुंदर निसर्ग आपल्याला पावसात पहायला मिळतो. कवी दुर्गेश सोनार यांनी निसर्गाचा हाच धागा पकडलाय या प्रस्तुत कवितेतून... विविध विषयांच्या, आशायांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रहो...
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)

Tuesday, June 28, 2016

आपल्या काळजाच्या लेखणीने गजलला नवे पैलू पाडणा-या श्रेष्ठ गजलकार बशीर बद्र यांची गजल "कविता मना-मनातली"च्या रसिकांसाठी...
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)

# Bashir Badra - Inn Ankhose @ Kavita Mana Manatali

Sunday, June 26, 2016

पाऊस हा सर्वांचा सारखाच असतो असं नाही. ज्यांचं छप्पर गळकं असतं त्यांना पावसाचं खरं येणं जाणवतं. अशीच एक पावसाची शाळा आपल्यासमोर उभी केलीय कवी सतीश सोळांकूरकर यांनी...या पेजचा उद्देश केवळ कविता प्रसिद्ध करून मनोरंजन करणं नसून, तर विचार प्रक्रिया सुरू करणं आहे. तुम्ही जर या विचारांशी सहमत असाल तर "कविता मना-मनातली" हे पेज लाईक आणि शेअर करून या चळवळीत सहभागी व्हायला विसरू नका दोस्तहो!
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)

#Satish Solankurkar - Shaletalya Divasatala Paus @ Kavita Mana Manatali

Saturday, June 25, 2016

लहानांपासून थोरांपर्यंत पाऊस हा जिव्हाळ्याचा विषय. पाहुण्यासारखा तीन-चार महिने येतो आणि सारी सृष्टी आपल्या कवेत घेतो. याच पावसाची सुंदर रुपं कवी नलेश पाटील यांच्या या प्रस्तुत कवितेतून येतात. विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरु नका दोस्तहो...
# Nalesh Patil - Paus - Kavita Mana Manatali